सुरुवातीला सर्वाना गुढी पाडवा दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा ! मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी वर्षाचा पहिला सण म्हणून गुढी पाडवा प्रचलित आहे.
प्राचीन ग्रंथ वेदांग ज्योतिष सांगितलेल्या प्रमाणे हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक प्रचलित मुहूर्त आहे. हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गुढी पाडवा साजरा करतात.
प्राचीन पौराणिक कथेनुसार, श्री विष्णू अवतार श्रीराम याच दिवशी लंकेच्या रावणाचा पराभव करून अयोध्ये मध्ये परतले होते . प्राचीन परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी कुंटुबात धनधान्य आणलं जातं. शेतीची आणि पिकाची पूजा केली जाते. तसेच घरी नवीन सोनं, नवीन वाहन किंवा उपकरणे , नवीन घर यांची आवर्जून खरेदी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी सुरु केलेले नवीन काम खूप शुभ मानलं जातं.
गुढी उभारताना कलश का ठेवता ?
गुढीवरील असणारे कलश हे मंदिरावरील कलशाचे प्रतीक मानले जाते. कलश नेहमी जमिनीकडे तोंड करून गुढीवर उलटा ठेवला जातो. जमिनीच्या माध्यमातून तुमच्या घरात आणि कुटुंबात ऊर्जा यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. तांब्यावर काढलेले स्वस्तिक शुभ आणि सर्वांगीण प्रगतीचे प्रतीक मानले जाते. तसेच गुढीसमोर ठेवलेला कलश हे मंगल आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कलशाचे तोंड जमिनीकडे असल्याने कलशाच्या पोकळीतून बाहेर पडणाऱ्या लहरी तांब्याच्या कडुलिंबाची पाने आणि रेशमी कापड सात्विक लहरींनी जड करतात. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती या प्रसारित ऊर्जेचा प्रवाह पृथ्वीच्या दिशेने हस्तांतरित करते. तसेच, गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे, नदलहरी कलशाच्या पोकळीत काम करतात. या लहरींमध्ये हवा आणि आकाशाची उच्च तत्त्वे समाविष्ट आहेत, असे म्हणतात. स्वस्तिक हे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ ‘कल्याण असो’ असा आहे. स्वस्तिकातून सात्त्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्यातील चैतन्य वातावरणातील वाईट शक्ती दूर करण्यास मदत करते. त्यामुळे कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते.
गुढी उभारताना वापरले जाणारे , कलश, बत्तासे, हार, कडुलिंब, रेशमी वस्त्र यांना केवळ सांस्कृतिक नाही तर नैसर्गिक आणि आरोग्यदृष्ट्याही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्रात मराठी कुटुंबात गॉड पुरणपोळी , खीर , श्रीखंड, बासुंदी मसालेभात, आमरस, भजी , पापड असे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ आणि भाज्या, चटण्या, गुलाबजाम, कोथिंबीरवाडी अशा वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते. या गुडी पाडव्यादिवशी घरातली सर्व मंडळी आवर्जून एकत्र पणे बसून जेवणाचा आस्वाद घेतात आणि घरात नवीन वस्तू , सोने , उपकरणे हि खरेदीसाठी हा दिवस उत्तम मानला जातो.
Reference : Wiki