LOAN waiver list 50000 अनुदानाची 4थी List महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना

महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने ५० हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहन अनुदान योजना घोषित केली असून, ७ हजार ७३3 शेतकऱ्यांच्या खात्यात ३० कोटी ४७ लाख रुपये जमा झाले आहेत. रक्‍कम जमा करण्याची प्रकिया सुरू असून, इतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाने आतापर्यंत दोन वेळा पीक कर्जाच्या माफीची योजना राबविली आहे. महात्मा
ज्योतिराव फुले शेतकरी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली 50 हजार अनुदान योजनेची चौथी यादी तुम्हाला जवळच्या सीएससी / आपले सरकार सेवा केंद्रावर पाहायला मिळणार आहे.

Link : https://mjpskyportal.maharashtra.gov.in/

 योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022
योजना कोणी सुरु केली  महाराष्ट्र सरकार
उद्दिष्ट नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्यांना लाभ देणे
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
 फायदे 50,000 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान
 अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन
 फॉर्म नोंदणी लिंक  https://mjpsky.maharashtra.gov.in/

 

एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत असताना नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताच फायदा होत नव्हता. शिवाय प्रत्येक वेळी कर्ज माफी करणे शक्य नाही. कर्ज परतफेड करण्याची सवय शेतकऱ्यांना लागावी. या उद्देशाने ‘नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते.या योजनेसाठी शासनाने ७०० कोटी रुपयांची तरतूद केली असून , जिल्ह्यातील ७ हजार ७३३ शेतकऱ्याचा खात्यात प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ३० कोटी ४७ लाख खपये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्याचा खात्यात रक्कम जमा करण्याची प्रकिया सुरू आहे.

Leave a Comment