१ एप्रिलपासून वित्तीय वर्ष २०२३-२४ सुरु झाले आहे. या नव्या वित्त वर्षात १२ महत्त्वपूर्ण वित्तीय बदल होत आहेत.
यात सराफ बाजारात केवळ ६ अंकी हॉलमार्कचे सोनेच विकले जाणे, तसेच पेनकिलर आणि अँटीबायोटिक्स औषधी महाग होणे यांचा समावेश आहे.
नवी आयकर प्रणाली
करदात्यांना नवीन आयकर व्यवस्था मिळेल. यात कर सवलत ७ लाख रुपये करण्यात आली आहे. आधी ती ५ लाख रुपये होती.
५० हजारांच्या स्थायी वजावटीची सोय तिच्यात आहे. त्यामुळे नोकरदारांना ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.
सोने महागणार
सोने GOLD व इमिटेशन ज्वेलरीवरील आयात कर २० टक्क्यांवरून २५% तर चांदीवरील आयात कर १.५ टक्क्यांवरून १६ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सोन्यासह सर्व दागिने महागतील.
सोन्याच्या दागिन्यांवर ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक
सोन्याच्या दागिन्यांवर ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना बंधनकारक दागिने विकता येणार नाहीत.
प्रधानमंत्री वय वंदना योजना बंद
पंतप्रधान वय वंदना योजना बंद होईल. ६० वर्षापेक्ष जास्त वय असलेल्या लोकांसाठी हि एक रकमी हफ्त्याची पेन्शन योजना होती
पीएफ काढल्यास २०% कर
पॅन क्रमांक जोडलेला नसलेल्या खात्यातून पीएफ काढल्यास ३०%
टीडीएस कापला जात होता. १ एप्रिलपासून २०%च कापला जाईल.
छोटी बचत, मोठा फायदा – अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ
केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधि सोडून सर्व योजनांच्या व्याजदरात ०.२० ते १.१० टक्क्यांनी वाढ केली. नवीन दर हे जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी लागू असतील.
सरत्या वर्षाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात केंद्र सरकारने टपाल खात्यात बचत करणार्या गुंतवणूकदारांना गिफ्ट दिले आहे.
जीवन विमा पॉलिसी
५ लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियम पेक्षा अधिक जीवन विमा हप्त्यातून होणारे उत्पन्न १ एप्रिलपासून करपात्र असेल यामुळे गुंतवणूकदारांना अधिक करावा भरावा लागेल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना १ एप्रिलपासून सुरु होणार आहे . यात महिला २ वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवू शकतील. त्यावर ७.५ टक्क व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतववूणूक करता येईल. आधी ही मर्यादा १५ लाख रुपये होती. या योजनेत वार्षिक ८% व्याज मिळते.
औषधी महाग होणार
सरकारने औषधांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वेदनाशामके व प्रतिजैविके यांसह ३०० पेक्षा अधिक औषधी महाग होतील.
डेट फंडावरील एलटीसीजी सवलत बंद
म्युच्युअल फंडांवर दीर्घकालीन लाभ (LTCG) सवलत बंद होईल. त्यामुळे त्यावर कर स्लॅबच्या हिशेबाने कर लागे.
1 एप्रिल 23 पासून १७ गाड्या होणार बंद : आरडीईचे नवे नियम लागू झाल्याचा फटका
पूर्ण लेख इथे वाचा