महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र मधे पुणे , कोल्हापुर ,सांगली , सतारा , नाशिक , जळगाव ,बीड, सोलापुर 1056 रुपयांना मिळणारा 14 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर आता 1106 रुपयांना मिळत आहे.
6 जुलै 2022 रोजीही सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती म्हणजेच गेल्या वर्षभरात किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर तिथे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350.50 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
होळी सनापूर्वी सर्वसामन्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे.