लेक लाडकी योजना : वयाच्या १८व्या वर्षापर्यंत जवळपास ९८ हजार रुपयांची मदत | Lake Ladki Yojana Online Apply

सरकारी योजना » लेक लाडकी योजना : वयाच्या १८व्या वर्षापर्यंत जवळपास ९८ हजार रुपयांची मदत | Lake Ladki Yojana Online Apply

 

राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना महाराष्ट्र सरकारने ९ मार्च रोजी मुलींच्या शिक्षणासाठी लेक लाडकी योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलींना हप्त्याने आर्थिक मदत करेल. मुलीना आधिकदृषटया सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, आपल्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा.याकरिता महाराष्ट्र सरकारने ही योजना पुन्हा आरंभित केली आहे.जेणेकरून त्यांना शिक्षण मिळून चांगले जीवन जगता येईल.

Maharashtra Lek Ladki Yojana 2023

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 बद्दल सर्व महत्वाची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आमचा लेख जरूर वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र लेक लाडकी योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती या लेखात अगदी सोप्या शब्दात सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकाल.यात मुलीच्या वयाच्या १८व्या वर्षापर्यंत जवळपास ९८ हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.

 

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 Key Highlights

योजनेचे नाव Maharashtra Lek Ladki Yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना
घोषणा महाराष्ट्र सरकार
लाभार्थी गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुली
उद्देश्य मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे
आणि मुलीना आधिकदृषटया सक्षम अणि आत्मनिर्भर
लाभ १८व्या वर्षापर्यंत जवळपास ९८ हजार रुपयांची मदत
राज्य महाराष्ट्र
वर्ष 2023
अर्ज प्रक्रिया अद्याप उपलब्ध नाही
अधिकृत संकेतस्थळ लवकरच अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे

 

लेक लाडकी योजनेत आर्थिक मदत किती मिळेल ?

  • पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात मुलीच्या जन्मावर – रु. ५०००/-
  • इयत्ता 1 मध्ये प्रवेश घेतल्यावर – 4000 रुपये
  • सहावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यावर –6000 रुपये
  • 11वी मध्ये प्रवेश घेतल्यावर – 8000 रुपये
  • वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून रु.७५०००/- देण्याची तरतूद आहे.
  • म्हणजेच वयाच्या १८व्या वर्षापर्यंत मुलींना जवळपास ९८ हजार रुपयांची मदत आहे.

 Lek Ladaki Yojana – Girls receive assistance worth around 98 thousand rupees up to the age of 18.

Lek Ladaki योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी मुलगी असावी.
  • अर्जदाराचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत असावे.
  • पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

 

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा

ज्या अर्जदारांना लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ही योजना नुकतीच सुरू झाली आहे. या योजनेच्या अर्जाची अधिकृत GR अद्याप झालेली आलेला नाही. या योजनेची माहिती मिळताच आम्ही तुम्हाला तात्काळ कळवू.

Leave a Comment