नुसतं सिनेमा पाहून पोस्टरजवळ फोटो काढून आणि ते फोटो स्टेट्सला ठेवून बाईपण भारी होणार नाही… सिनेमात जायलं गेलेलं गाणं गुणगुणत घरी येता..
मूल नसलेल्या जावेला नाक मुरडता. विधवेला पाहून तोंड वाकडं करता. कुणी काडीमोड झालेली माहेरी असेल. तर सोडलेली म्हणून हिणवता…हेच का
तुमचं बाईपण…??
एकमेकांना आदर द्या.. कुणाला मुलं नाही, नवरा नाही म्हणून तिला हिणवण्यापेक्षा तिचं दुःख समजून घेऊन तिला आधार द्या. बाईचं दुःख
बाईच समजू शकते! आज जिच्यावर तुम्ही. हसता उद्या तिच्या जागी कदाचित तुम्ही असाल… तेव्हा कुखात रडतानाही तुम्हाला स्वतःचीच लाज
वाटेल…हेही बघितलंच की सिनेमात एखादी स्त्री कुखी असेल तर ती.
तिच्याच भानात असते, तिला नसतो वेळ तुमची वाकडी तोंडं पाहण्यासाठी. तुमच्या सुखाला नजर लावण्यासाठी. तुम्ही मात्र कायम तिच्याकडे वाकड्या
नजरेने पाहता. का? सिनेमातील पात्रांनी केलेल्या चुका आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्या अन् गुणगुणत राहा..बाईपण भारी देवा…॥
बाईपण भारी ग..!॥
बाईपण भारी देवा सिनेमाने आतापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केलीय.